• Things end but memories forever !

    "धैर्य दे अन् नम्रता दे

    पाहण्या जे जे पाहणे

    वाकू दे बुध्दीस माझ्या

    तप्त पोलादाप्रमाणे"

    “Things end but memories forever” भविष्य काळाची स्वप्न पाहणारा वर्तमानातला प्रत्येत क्षण हा भूतकाळात परिवर्तीत होत असतो, पण ते क्षण आठवणीच्या स्वरुपात कायम सोबत राहतात. ते आयुष्याची पुंजी बनून. मग कधी तरी आयुष्याची ही पोतडी आपण उघडावी आणि जमा खर्चाचा हिशेब मांडताना जर आनंदाच्या आठवणींचे पारड जडं होत असेल तर आपण स्वतः ला भाग्यवान समजावं का? प्रत्येक व्यक्तिचा आनंद हा भिन्न गोष्टींमध्ये असतो. पण आंतरिक समाधान मात्र प्रत्येकाचं चांगल्या गोष्टीमध्ये असतं यावर माझी श्रद्धा आहे.
    ही सगळी उठाठेव का तर सरणारे वर्ष काही घटका मोजत आहे. आणि येणा-या वर्षाची पाऊले दारापर्यंत पोहचली आहेत. मी त्याचे स्वागत करायला एकीकडे सज्ज आहे पण माझा एक हात गत काळाच्या स्मृतींनी धरुन ठेवला आहे.

    मी त्यातून स्वताला अलगद सोडवू पाहतो आहे आणि त्यातला एक एक धागा माझ्या डोळ्या समोर उलगडतोय, तुम्ही म्हणाल हे धागे कसले संसाराचे, आप्तेष्टांचे, स्नेह बंधनाच्या सुखद आठवणींनचे ? हो ते तर आहेच पण ते तर कमी अधिक अनेक वर्ष आहेतच...पण आज मनात रेंगाळत आहेत ते मला आपलं मानणा-या लोकांमध्ये मी गेल्या वर्षात वावरलो त्यांच्या प्रेमळ आठवणीं .


    आपलुकेचे एखादे आमंत्रण यावे आणि प्रेमाखातर मी ते स्वीकारुन तिथे जाऊन मी त्यांच्याशी संवाद साधावा, पण या वर्षांत हे एकदा नाही, दोनदा नाही तर 65 हून अधिक ही आमंत्रणे मी आनंदाने स्वीकारली, आणि लोकांच्या प्रेमाखातर मी कुठला ही पल्ला, लांब अंतर कुठल्याही त्रासा शिवाय पार करु शकलो. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत शब्दशा प्रवास झाला. वेगवेगळ्या निमित्ताने भाषणे झाली.

    बाकी वर्षभर माझं थोडफार बौध्दिक काम के अविरत सुरू राहिलच, अभ्यास, वाचन हे माझ्या फक्त कामाचा नाही तर आवडीचाही भाग आहे पण त्यातून थोडबहुत लेखनही झाल...चांगले ३०-३२ लेख विविध ठिकाणी प्रकाशित झाले. First post सारख्या ठिकाणी JNU तील घडामोडींवर प्रकाशित झालेला लेख हा तर ५०० पेक्षा अधिक शेअर झाला. तसा मी टीव्ही वरुन ब-याचदा जनतेच्या घरी पोहचत असतो. आणि त्याचा फिडबॅक लोकांच्या कौतुकाच्या पावतीमुळे सतत मिळत राहीला. मी सहज मोजमाप केलं तर या वर्षी मी जवळ जवळ २३२ पेक्षा अधिक वेळा टीव्हीवरील अनेक बुद्धिमान आणि मान्यवर लोकांच्या तावडीत न सापडला सहज स्वत:ला सोडवलं की राव...

    मागे वळून पाहताना हातात काय आहे हे पाहिल तर समाधान आणि हीच माजी वर्षभराची मिळकत...आज हे घेऊन पुढे जाणार आहे...नविन वर्षात... संकल्पाची यादी बनवताना त्या यादीला सूत्रबध्दता येईल या वर्षीच्या याच ठोस मिळकतीच्या आधारे...संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयन्त सुरूच असतील आपल्या शुभेच्छांच्या आधारे... ही वाटचाल अशीच सुरू राहु दे मर्डेकरांच्या कवितेतील त्या ओळी प्रमाणे -

    "धैर्य दे अन् नम्रता दे

    पाहण्या जे जे पाहणे

    वाकू दे बुध्दीस माझ्या

    तप्त पोलादाप्रमाणे"

    या वर्षाच्या समारोपाप्रसंगी आपले सर्वांचे आभार आणि आपल्याला नव्या वर्षाच्या शुभेच्छा.. आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!
  • You might also like

    1 comment:

    1. सर प्रेरणादायक लेखन 👌👌

      ReplyDelete