• वर्षत सकळ मंगळीईश्वर निष्ठांची मांदियाळी 

    गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्रात फिरत होतो. इतरजण शनिवार रविवार सुटी साजरी करत असताना मी मात्र गावागावात फिरत होतो. राजकीय कार्यकर्त्यांचा शनिवार रविवार हा नेहमीच धावपळीचा असतो पण या दोन महिन्यांतील शनिवार रविवारचा माझा कार्यक्रम जणू ठरलाच होता. पहाटे ४.३० ला निघाव ९ ला पहिल भाषण कराव मग दोन वाजता दुसर आणि संध्याकाळी ६ नंतर तिसर भाषण करून दुसऱ्या दिवसांच्या भाषणाच्या गावी मुक्कामाला जाव.

    निमित्त होत भाजपाचे दिनदयाळ उपाध्याय अभ्यासवर्ग. भारतीय लोकशाहीचा उद्देश यशस्वी होण्यासाठी आणि राजकारणात काम करणारे अधिक प्रगल्भ होण्यासाठी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच नियमीत प्रशिक्षण व्हायला हव ही भूमिका घेऊन भाजपा आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण घेत असत. गेल्या दोन वर्षात पक्षात अनेक कार्यकर्ते नव्याने दाखल झाले. भाजपाची वैचारिक भूमिकासरकारची कामनिर्णयसमाजमाध्यमांचा योग्य उपयोग असे विषय या अभ्यासवर्गातून मांडले जायचे. जिल्ह्याजिल्ह्यात असे निवासी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आले होते.

    या अभ्यासवर्गासाठी काही जिल्ह्यांमध्ये जाऊन विषय मांडण्याची संधी मला मिळाली पण माझ्या दृष्टीने ही संधी विषय मांडण्याची नव्हती तर महाराष्ट्र अनुभवण्याची होती. मुंबईत राहून आणि अभ्यास करून टिव्हीवर मत मांडणे आणि प्रत्यक्ष ज्याला ग्राऊंड झीरो’ म्हणतात अस त्या ठिकाणी जाऊन समजावून घेण वेगळ. दुष्काळात मी जल शिवारची काम पहात गावागावात हिंडलोआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गावात गेलो. आता मला वेगळी संधी मिळाली होती. मुद्दाम टिव्हीपासून लांब राहीलोचर्चापासून लांब राहिलोटिव्हीवरच्या चर्चेतील गोंगाटापासून आणि विरोधकांच्या कोलाहलातून दूर जात सरकार बद्दलच खर मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

    या निमित्ताने अनेक ठिकाणी जाणखूप कार्यकर्त्यांना भेटण झाल. सांगली जिल्ह्याच्या टोकाला असणाऱ्या गड्डापूर या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या गावातही गेलो आणि तिकडे अमरावतीत राम शेवाळकरांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या अचलपूर परातवाडा  गावी जाण्याच्या योग आला. संत ज्ञानेश्वरांची जन्मकर्म आणि समाधीभूमि असणाऱ्या आळंदीत त्यांच्या समाधीवर डोक ठेवण्याचा अमृतानुभव घेता आला. तर भक्तांसाठी वर्षानुवर्षे कटीवर हात ठेऊन उभा असणाऱ्या विठुरायाच दर्शन घेण्याचा योग आला. कोल्हापूरसांगलीपुणेसोलापूरठाणे ते रत्नागिरी व्हाया अमरावती अशा विविध जिल्ह्यातील सर्व स्तरातील कार्यकर्तांना भेटण्याची संधी मिळाली.

    वर्ग त्यांचा होता पण शिकत मात्र मी होतो. वर्गातील सत्र संपल की माझी शिकवणी सुरू व्हायची. कार्यकर्ता आणि जनता यांच्यात मिसळत होतो. गावातल्या कुठल्यातरी टपरीवर थांबावफरफरणाऱ्या स्टोच्या आवाजात मस्त गरमागरम चहाचे घोट घ्यावेत आणि सहजपणे गप्पांसाठी मग काय म्हणतंय यंदा पीकपाणीअसा खडा टाकावा... मग काय पीकपाण्यापासून जल शिवार पासून ते अनेक विषय निघत जायचे. अगदी क्रिकेटच्या गप्पापासून ते मोदीबाबा चांगला हायकाय तर नक्की करून दाखवल” किंवा त्यो फडणीस भला माणूस हाय” इथपर्यत गप्पा रंगायच्या. सरकारची विश्वासहर्ता दिसत होती. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्ल जनतेत असणारी कमालीची आस्था त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत होती. समाज माध्यमांपलीकडचा खराखुरा समाज अनुभवत होतो. यातूनच टीव्हीवर चमकणारेवातानुकुलीत खोलीत मत बनवणारे विश्लेषक जमीनी वास्तवापासून किती दूर आणि पूर्वग्रहदूषित आहेतहेही लक्षात येत होत.

    काही ठिकाणी लोक ओळखायचे. टीव्हीवर दिसता ते तुम्हीच काय’ आणि इथ आमच्या गावच्या टपरीवर चाय कस पिताव’ असपण विचारायचे. फोटो काढून घ्यायचे. रोज दिसणारा टिव्हीवरला माणूस आज आपल्या गावात इतक्या सहजपणे टपरीवर चहा पितोय याच अप्रूप असायच. निघताना कोणी म्हातारा हातात काही कोंबायचा कधी एखादी भाजी असायची तर कधी एखाद निवेदन. एखादा तहसीलदार दाद देत नसल्याचा सांगायचा तर कुणी यंदा शेततळ झाल्याच सांगायच.

    लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ज्या वरून विरोधक आकांडतांडव करत आहेत प्रसारमाध्यमातील एक गट सरकारच्या विरोधात आघाडी उघडून आहे त्याच थोडही प्रतिबिंब दिसत नव्हतं.. सरकारच्या प्रयत्नाची फळ जनतेला मिळत होती. पडलेल्या पावसानं तुंडुब भरलेली जलशिवारशेतातल्या शेततळ्यात साठलेलं पाणी आणि पिकविम्यामुळे दूर झालेली त्यांची काळजी हे जाणवत होत.

    खूप दिवसांनी पुन्हा शेतात उतरलो. नुकत्याच उगवलेल्या हिरव्यागार लुसलुशीत गवतावर पाय ठेवल्यानंतरचा अनुभव आजही तसाच ताजा आहे. रायगडमध्ये भातशेतात गुडगाभर पाय बुडवून चिखलाने कपडे खराब करून घेतले तर अमरावतीत परहाटी’ (कापूस) लावणाऱ्या शेतकऱ्यांशी गप्पा मारल्या. शिरूर जवळच्या शिक्रापूरच्या शेतात जाऊन भाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्यासोबत पीकविम्याबद्दल बोललो. मिळेल ती माहिती साठवण्याचा प्रयत्न करीत होतो. खेड शिवापूर जवळ असलेल्या एका गोशाळेत गेलो. इथे फक्त भाकड गायी संभाळल्या जात होत्या. कोल्हापूरात कण्नेरी आश्रमात काढसिध्देश्लवर महाराजांना भेटलो ते शेतीबाबत अनेक प्रयोग करीत आहेत. त्याची माहिती घेतली. एलपीजीमुक्त गाव ही योजना काही गावात अंमलात आणत आहेत.  या बरोबर अर्थात खाद्यभ्रमंती सुरूच होती. अमरावतीत प्रथमच उकलपेंडी खाल्लीकोल्हापूरची मिसळलोणावळ्यात भुरभुरत्या पावसात घेतलेला गरमागरम भज्यांचा आस्वाद मस्तच होता. लोकांशी बोलताना नवे मुद्दे कळत होते. जी माहिती होती ती नव्याने समजावून घेत होतो. नवा अर्थ मला मिळत होता. नवे कंगोरे कळत होते. समाजात होत असलेले बदल जाणवत होते. भाषणाच्या निमित्ताने जात होतो पण प्रत्यक्षात भरभरून मी स्वताला काही आणत होतो. नव बरच काही गवसत होत. माहितीने समृध्द होत होतो. कवी इक्बाल म्हणतो तशी माझी स्थिती होती.

    धुंडता तो फिरता हू मै इ इक्बाल अपने आप को
    आप ही गोया मुसाफिरआप ही मंजील हू मै

    खरतर अस फिरण नव नाही. अनेक वेळा मुंडे साहेबांसोबत मी फिरलो आहे. त्यांची गावागावतील प्रश्न समजून घेण्याची पध्दतलोकांत मिसळण्याची पध्दत अनुभवली आहे. पण त्यावेळी एक कार्यकर्ता म्हणून साहेबांसोबत जात होतो. यावेळी वाढलेली जबाबदारी जाणीव करून देत होती. लोककार्यकर्ते भेटत. माझ्या भाषणाचे अथवा टिव्हीवरील चर्चेच कौतुक करत होते. काहीजणांना माझ्यातील न चिडण्याच कौतुक होत काही जणाना माझ्यातील अभ्यासाच कौतुक होत. पण मी मात्र हे प्रेम अनुभवत होतो. मला आनंद होता या आपल्या लोकात मिसळल्याचा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काहीना काही शिकत असतो आणि त्यातून जाणीवा रूंदावत असतातमत प्रगल्भ होत असतातवास्तवाच भान अहंकाराला ठेचत असत. नवे आयाम दिशा दाखवतात. गेले दोन महिने जणू माझ्यासाठी हाच एक वर्ग होता. महाराष्ट्रातील कार्यकर्ते घडत होते पण त्यांच्याजोडीला मी बीघडलो हे नक्की. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानात म्हटल आहे.

    वर्षत सकळ मंगळीईश्वर निष्ठांची मांदियाळी

    अनवरत भूमंडळी भेटतू या भूता

    जगातल्या संतानीविभूतीनीमंगल गोष्टीनीविश्वातील प्राणीमात्रांना भेटल पाहीजे. अस ज्ञानेश्वर म्हणतात. मी संत नाहीमी श्रेष्ठही नाहीज्ञानीही नाही पण लोक प्रेमाला पात्र ठरतोय हा आत्मविश्वास लोकांकडूनच मिळाल्यावर मी हा भेटीचा अन संवादाचा सेतू अजून बांधत रहाव हे मला मनापासून वाटल. श्रेष्ठ पुरूषाने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगल पाहीजे हा गीतेचा संदेशज्ञानेश्वरांचा संदेश माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीच दिशा दाखवणारा..  नव्याने बीघडवणारा
  • You might also like

    No comments:

    Post a Comment