• अखंड कार्यमग्न

     

     


    पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस, आयुष्याची 71 वर्षे पूर्ण करणारे मोदीजी हे सदैव सेवा आणि समर्पण वृत्तीने कार्य करत राहीले. नव भारताचे नवे रूप जगासमोर मांडणाऱ्या या द्रष्ट्या नेत्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली भारत वेगाने विकासाच्या मार्गावर जात राहील हा विश्वासही आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आयुष्याची 71 वर्षे पूर्ण करणारे मोदीजी स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत.एक निष्ठावान संघ कार्यकर्ता ते प्रभावशाली पंतप्रधान असा मोदीजी यांचा प्रवास थक्क करून टाकणारा आहे.

    मोदीजी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून अशी 20 वर्षे संवैधानिक जबाबदारी एकही दिवस सुट्टी न घेता समर्थपणे निभावली. या 20 वर्षांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर मोदीजींची अनेक गुणवैशिष्ट्ये जशी चटकन नजरेत भरतात तशीच एक गोष्ट पटते की त्यांची खुर्ची सदैव काट्यांचीच होती. म्हणतात ना ‘Born with the silver spoon..’ काही जण जन्माला येतानाच चांदीचा चमचा घेऊन येतात, मात्र मोदीजींचे तसे नव्हते. इतके साधे, सरधोपट आयुष्य मोदीजींचे कधीच नव्हते. वेळोवेळी आयुष्यात चढ-उतार, वारंवार कसोटीचे क्षण, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मेहनत तसेच टीकेचे बाण सतत मोदीजींना झेलावे लागले. पण अस्सल सोने जसे तावून सुलाखून उजळते तसेच मोदीजींच्या कार्याला देखील उजाळा मिळत गेला.चहुबाजूंनी जरी टीकेचे वाक्‌बाण सुटत असले तरी ठरवलेले लक्ष्य समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी अहोरात्र झटणा-या मोदीजींची उर्जा, कल्पकता, सूक्ष्म नियोजन, निर्णयक्षमता खरंच अचंबित करणारी, त्यांच्याकडे पाहूनच सर्व कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळते.

    मोदीजींच्या मार्गात सुरुवातीपासूनच असंख्य अडचणी होत्या. उदाहरणेच द्यायची तर अनेक आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर लागलीच कच्छ भूकंप पिडीतांच्या पुनर्वसनाच्या आव्हानाचा सामना करावा लागला .गोधरा हत्याकांड प्रकरणी असंख्य आरोप आणि कमालीची टीका केली गेली. अमेरिकेने व्हीसा नाकारला , नंतर पंतप्रधानपदाच्या काळात प्रत्येक निर्णयावर विरोधकांनी टीका करण्याचा जणू विडाच उचलला. सीएए, 370 कलम रद्द यावरून टीकास्त्र सुटली, कोवीड काळातही टोकाची टीका झाली, काहीही केले तरी विरोधाला विरोध म्हणून सतत टीका झाली तरी मोदीजींच्या संयमाचा बांध कधी फुटला नाही. गरीब कल्याण आणि जनहित डोळ्यासमोर ठेवूनच एका विशीष्ट व्हिजनने त्यांचे काम अव्याहत सुरू असते.

      प्रत्येक वेळी मोदींजींनीअफाट क्षमता आणि कार्यकुशलतेमुळे समोरच्यांना नामोहरम करत  जगभरात एक प्रभावशाली नेता म्हणून मान्यता मिळवली. ‘टाईम’ सारख्या जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या नियतकालिकाने मोदींना कव्हर पेजवर स्थान देणे तसेच आत्तादेखील टाइम मॅगेझीनच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदीजींचे नाव झळकणेही काही बोलकी उदाहरणे आहेत.

    संवैधानिक जबाबदारीच्या 20 वर्षांवर धावती नजर टाकली तर मोदीजींचे विचार,धोरणे त्यांचे निर्णयकाळाच्या पुढे जाणारे होते हे मनोमन पटते. 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि 26 मे 2014 ते आजतागायत असे सलग दोन वेळा पंतप्रधानपदी विराजमान झालेले मोदीजी म्हणजे एक असामान्य, एकमेवाद्वितीय असे व्यक्तिमत्व.

    मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून या 20 वर्षांच्या कार्यकाळात मोदीजींनी जनहितार्थ अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले तसेच अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या. त्यावर एक धावती नजर टाकूया..

    7 ऑक्टोबर 2001 ला गुजरातचे मुख्यमंत्री बनले. लागलीच चोख नियोजन करत कच्छ भूकंप पिडीतांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर भर दिला. विनाशकारी भूकंपाच्या दुष्परिणामांचा सामना करणाऱ्या गुजरातचा त्यांनी विकास इंजिनाच्या रुपात कायापालट केला

    2002 साली मोदींजींच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये विक्रमी मताधिक्क्याने विजय प्राप्त झाला.

    2003 सालीगुजरातमध्ये उत्तमोत्तम मुलभूत सोयीसुविधा पुरवत जगभरातील गुतवणूकदारांना आकर्षित करणारा व्हायब्रंट उद्योग मेळा भरवला.  उद्योग मेळ्यात 14  मिलियन डॉलर्सचे 76 सामंजस्य करार झाले.

    2004 साली महिला सबलीकरणाच्या उद्देशाने मुलींच्या शिक्षणासाठी कन्या केलवानी ही आर्थिक प्रोत्साहन योजना जाहीर केली.

    2005 साली बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना आणली.

    2006 साली ज्योतीग्राम योजनेअंतर्गत राज्यातील सर्व गावांना 30 महिन्यांमध्ये 24 तास वज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट ठेवले आणि ते पूर्ण केले.

    2007 साली विधानसभा निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली.

    2008 साली गुजरातमध्यो टाटा नॅनो चे स्वागत आणि कार मॅनिफॅक्चरिंग हब म्हणून गुजरात नावारुपास आले.

    2009 साली इ-ग्राम, विश्व ग्राम योजनेमुळे 13,693 ग्रामपंचायतींना ऑनलाइन जोडण्यात आले.

    2011 साली सद्भावना मिशन अंतर्गत 15 लाख लोकांशी संवाद साधत रेकॉर्ड प्रस्थापित केले.

    2012 साली मोदींजींनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

    2013 साली मोदीजींना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून घोषित करण्यात आले.

    2014 साली भारताचे पंतप्रधान बनले. जनधन योजना तसेच स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली .

    2015 साली 21 जून ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. संयुक्त राष्ट्रसंघात 177 देशांनी मोदींच्या योग दिनाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

    2016 साली काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे या उद्देशाने अत्यंत धाडसी असा नोटबंदीचा निर्णय घेतला.

    2017 साली वस्तू व सेवा कर प्रणालीमुळे एक राष्ट्र, एक कर आणि एकसंघ बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात आकाराला आली.

    2018 साली सरदार वल्लभ भाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा, जगातील सर्वाधिक उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीत्यांच्या जयंती दिवशी राष्ट्राला अर्पण केला.

    2019 साली मोदीजी दुस-यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. काश्मीरला लागू असलेले कलम-370  कलम-35(अ) रद्द करण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. तसेच तीन तलाकला बेकायदेशीर ठरवले.

    2020 साली केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात आला. अयोध्येत राममंदिराचा भूमीपूजनाचा सोहळा संपन्न झाला.

    2021 साली ‘राष्ट्रीय चलनीकरण रूपरेषा’ योजनेची घोषणा. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता मध्ये सुधारणा करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला.

    2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुष्मान भारत, उज्वला योजना, पीएम सुरक्षा तसेच पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि हर घर जल या 6 योजनांच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येकाला लाभ पोहोचवण्याचे लक्ष्य आता साध्य करायचे आहे. देशाच्या विकासासाठी आणि जनहितार्थ असेच भरीव कार्य मोदीजींच्या हातून घडत राहील आणि भारत एका वेगळ्या उंचीकडे जाईल यात शंकाच नाही.

     

    (लेखांची पूर्वप्रसिद्धी प्रहार, 17 सप्टेंबर 2021)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र

     


  • You might also like

    No comments:

    Post a Comment