• दोषारोप नको, समन्वय हवा

     

    मत आमचेही

    लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. याचा या आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांवर काही परिणाम होणे अपेक्षित आहे. असे असले तरी जिंकलेल्या जागांच्या अंकगणितापेक्षा न जिंकलेल्या जागांवरील अदृश्य घटकांचे बीजगणित लक्षात घेणे आवश्यक आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना हे बीजगणित आणि महाविकास आघाडीने केलेला खोटा अपप्रचार याबाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे उतरले तर विजय युतीचाच असेल.



    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या निकालाचे विविध पातळ्यांवर विश्लेषण सुरू आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी 'महायुती' च्या झेंड्याखाली ही निवडणूक लढवली होती. महायुतीला लोकसभा जागांच्या प्रमाणात अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. संसदीय लोकशाहीत जागांच्या आकड्यांच्या खेळाला महत्त्व असते. कारण बहुमताचा आकडा जागांच्या आधारेच गाठता येतो. निवडणुकीच्या अंकगणितामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याचेच मोल अधिक असते. मात्र याखेरीज या अंकगणिताच्या पडद्यामागे बीजगणिताची अनेक प्रमेयं असतात. कोणत्या पक्षाला किती मते मिळाली, मागील निवडणुकीपेक्षा मतांची टक्केवारी किती प्रमाणात वाढली, किती प्रमाणात कमी झाली, किती विधानसभा मतदारसंघांत कोणाला आघाडी मिळाली, या प्रमेयांना निवडणुकीच्या राजकारणात मोठे महत्त्व डी असते. सामान्य मतदाराला कोणत्या पक्षाच्या खात्यात किती जागा गेल्या एवढे साधेसोपे अंकगणितच माहिती असते. निवडणुकीतील यश-अपयश संख्याबळाबरोबरच या प्रमेयांवरही आधारित असते. या आकडेवारीच्या आधारे पुढील निवडणुकांच्या यश- अपयशाची गणिते मांडली जातात.

    लोकसभेतील संख्याबळाचा विचार केला तर महाराष्ट्रात महायुतीच्या खात्यात १७, तर महाविकास हे. आघाडीच्या खात्यात ३१ जागा दिसत आहेत. मतांच्या या टक्केवारीचे प्रमाण पाहिले तर महायुती आणि न महाविकास आघाडी यांच्या मतांच्या टक्केवारीत अवघ्या अर्ध्या टक्क्याचाच फरक आहे. मात्र ब्ल महाविकास आघाडीच्या जागा महायुतीपेक्षा १४ ने जास्त आहेत. मतांची टक्केवारी आणि त मिळणाऱ्या जागा यांचे प्रमाण अनेक कारणांनी व्यस्त होऊ शकते. यावेळच्या लोकसभा हे. निवडणुकीत महायुतीच्या बाबतीत मिळालेली मते आणि मिळालेल्या जागा यांचे प्रमाण व्यस्त प होण्यास 'कोट जिहाद' हा घटक मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला आहे. ३१ जागा ण मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला १५० हून अधिक विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळालेली आहे, तर १७ जागा मिळवणाऱ्या महायुतीला १३० हून अधिक विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे.

    निवडणुकीचे हे बीजगणित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, भा लोकप्रतिनिधींनी बारकाईने समजून घेण्याची गरज आहे. महायुतीला जागांच्या प्रमाणात ब्ल अपेक्षित यश मिळाले नसल्याने महायुतीचे समर्थक, घटक पक्षांचे काही पदाधिकारी अस्वस्थ णे होऊन यासंदर्भात जाहीरपणे मतप्रदर्शन करू लागले आहेत. हे मतप्रदर्शन करताना एकमेकांवर च देषारोप होऊ लागले आहेत. अपेक्षित यश न मिळाल्याने निराशा येणे, नाराजी येणे स्वाभाविक आहे. मात्र ही निराशा, नाराजी व्यक्त करताना विरोधकांनी फार मोठे यश मिळवले आहे. पुढील निवडणुकीत आपले काही खरे नाही, अशी हतबलतेची भावना जाहीरपणे दिसू नये. खरं तर या निकालामुळे मनात हतबलतेची भावना येण्याचे काही कारणच नाही. या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे सर्व नेते आणि पदाधिकारी एकदिलाने उतरले होते. विरोधकांनी पसरवलेल्या अफवांना योग्य उत्तर देण्यात महायुती कमी पडली, हे वास्तव आहे. संविधान बदलले जाणार, अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण रद्द होणार अशा अफवा पद्धतशीरपणे पसरवल्या गेल्या. या पद्धतीने खोटेनाटे पसरविले जाईल, ही शक्यताच कोणी गृहीत धरली नव्हती. याच्या बरोबरीने महायुतीला पराभूत करण्यासाठी संपूर्ण राज्यात 'व्होट जिहाद' चा पॅटर्न अंमलात आणला गेला. त्यासाठी मशिदीमधून धर्मगुरूंमार्फत फतवे काढले गेले. या 'व्होट जिहाद'मुळे महायुतीला १५ जागांवर थेट फटका बसला. दहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा तीन ते चार टक्के मतांच्या फरकाने पराभव झाला. 'व्होट जिहाद'चा पॅटर्न नसता तर महायुतीच्या पारड्यात ३२ जागा दिसल्या असत्या. सुरुवातीस 'व्होट जिहाद'सारखे घटक प्रचारात येतील, अशी शक्यता महायुतीने गृहीत धरली नव्हती. म्हणूनच या निकालामुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, समर्थकांनी निराश होण्याचे कारण नाही. खखेोट्यानाट्या अफवा आणि व्होट जिहाद यासारखे घटक असूनही महायुतीला १३०- हून अधिक मतदारसंघात आघाडी आहे, ही एकच गोष्ट आपल्या विधानसभा निवडणुकीतील यशाची खात्री देणारी आहे.

    तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. याची काही उदाहरणे नमूद करणे आवश्यक आहे. धुळे मतदारसंघात मालेगाव शहर, जळगाव मतदारसंघात जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, रावेर मतदारसंघात चोपडा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. या सर्व मतदारसंघांता लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात भाजपचे आमदार असलेल्या कुलाबा आणि मलबार हिला मतदारसंघात, उत्तर-पश्चिम मतदारसंघात गोरेगाव, मावळ मतदारसंघात पनवेल, पिंपरी- चिंचवड या ठिकाणी शिवसेना उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. याखेरीज भाजप सहयोगी पक्षांच्या मतदारसंघातही महायुतीला आघाडी आहे. बारामती मतदारसंघात भाजपचा आमदारा असणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे. ही सर्व माहिती महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यापूर्वी महायुतीच्या प्रत्यक्ष रणांगणावरील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या उमेदवारांसाठी झटून काम केले आहे. ज्या ठिकाणी अपेक्षेनुसार मदत झालेली नाही, असे वाटता असेल त्या ठिकाणच्या तक्रारी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे आकडेवारी सकट मांडाव्यात. तसे न करता अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल सध्या सुरु असलेला एकमेकांकडे बोटे दाखवण्याचा अत्यंत दुर्दैवी आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला तेव्हा भाजप-शिवसेना युतीला सुमारे २३० विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. महायुती १३० हून अधिक विधानसभा मतदारसंघांता आघाडीवर आहे, याचे स्मरण ठेवूनच जाहीर वक्तव्ये करणे आवश्यक आहे. काही मंडळींना याचे भान राहिलेले दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात. विधानसभा निवडणुकीत खोटा प्रचार उपयोगात येण्याची शक्यता नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत एकदिलाने उतरण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आरोप- प्रत्यारोपाचा हा खेळ तातडीने बंद करणे आवश्यक आहे. आपले अंकगणित का चुकले आहे, हे शोधून काढले गेले आहे. विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच आहे, हे लक्षात ठेवा आणि आजपासूनच कामाला लागा.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – नवशक्ती,०९ जुलै २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment